आज ‘सायन्स एक्स्प्रेस’ धुळे रेल्वे स्थानकावर

0

धुळे। सायन्स एक्स्प्रेस जलवायू विशेष परिवर्तन रेल्वे बुधवार 26 जुलै 2017 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत धुळे रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर, अहमदाबाद यांच्यातर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थी व शिक्षकांसाठी मुख्यत: बनवले गेलेले सायन्स एक्स्प्रेस प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.

हे प्रदर्शन नि:शुल्क आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटही लागणार नाही. सायन्स एक्स्प्रेस हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा विशेष प्रकल्प आहे. ही 16 डब्यांची वातानुकुलित प्रदर्शनी रेल्वे भारत भ्रमण करीत आहे. आतापर्यंत 1 लाख 56 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार्‍या या गाडीने आठ वेळेस देशाचा प्रवास पूर्ण केला आहे.