आज स्त्री शक्तीपीठ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

0

जळगाव । महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,बी.एम.फाऊडेंशन, नजर फाऊडेंशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिना निमित्त स्त्री शक्तीपीठ पुरस्कार वितरण सोहळा 8 मार्च रोजी अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी आवार,जळगाव येथे सकाळी ठिक 10 वाजता पार पडणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सामाजीक, राजकीय, शैक्षणीक, उद्योग, सांस्कृतीक यासह विविध क्षेत्रात महिला सशक्तीकरण व सबलीकरण या साठी काम करून नाव लौकीक मिळविलेल्या महिलांना स्त्री शक्तीपीठ पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.

यावेळी 234 दोनशे चौतीस) प्रस्ताव प्राप्त झाले होते.सदर प्रस्तावातुन निवड समितीने 39 प्रस्तावांची निवड करण्यात आली आहे.त्यामुळे जागतीक महिला दिना निमित्त जिल्ह्यातील 39 महिलाना स्त्री शक्तीपीठ पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात येणार आहे.

या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सोहळा
यावेळी जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकर, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, जि.प.अध्यक्ष ना. उज्वला पाटील, आमदार राजुमामा भोळे, माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, स्त्री रोगतज्ञ डॉ.वर्षा लहाडे, अ‍ॅड.राजेश झाल्टे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, तहसिलदार अमोल निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलापुरकर, जि.प.समाजकल्याण अधिकारी अनिता राठोड, रमाई हॉस्पीटलच्या संचालीका अंजली बाविस्कर, कार्यक्रमाच्या मुख्य समन्वयीका मिनल केदार,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, संजय सुर्यवंशी, मुकेश सोनवणे, अनिल अडकमोल यांची प्रमुख उपस्थीती राहणार आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थीतीत रहावे, असे अवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, बी.एम.चे संस्थापक योगेश नन्नवरे, बी.एम.फाऊडेंशनचे अध्यक्ष शुभांगी बिर्‍हाडे, नजर फाऊडेंशन चे सचिव दिपक सपकाळे, प्रसिध्दी प्रमुख संतोष ढिवरे यांनी केले आहे.