आज होणार ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर स्थलांतरासाठी सोडत

0

जळगाव । शहरातील अतिक्रमण वाढल्याने महासभेत वारंवार चिंता व्यक्त करण्यात येत होती. यातून या हॉकर्सं बांधवांना ख्वॉजामिया झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात हॉकर्सला स्थलांतरित करण्याचा ठराव महासभेत ठराव करण्यात आला आहे. या ठरावानुसार आज शुक्रवार 11 मे रोजी स्थलांतरासाठी 782 हॉकर्सं बांधवांच्या जागा निस्चितीसाठी शुक्रवार 12 मे रोजी सोडत काढण्यात येणार आहे. यानंतर सोमवार 15 मे रोजी प्रत्यक्ष जागेवर स्थलांतरित करण्यात येणार आहे.

किरकोळ विक्रेत्यांचा समावेश
या सोडतीची माहीती अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून लाऊड स्पिकर लावून बळिराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड येथे हॉकर्स बांधवांना गुरूवारी देण्यात आली. या स्थलांतर करण्यात येणार्‍यांमध्ये बळिराम पेठेतील 383, सुभाष चौक 309 आणि शिवाजी रोड 90 असे एकूण 782 हॉकर्संना स्थलांतरित करण्यात येणार आहे. शुक्रवारी हॉकर्सला जागा देण्याचे सोडत काढली जाणार आहे. 444 भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते, 102 फूल विके्रते व 196 अन्य किरकोळ विक्रेते यांचा समावेश आहे.