आज होणार नवीन सीबीआय संचालकपदाची घोषणा !

0

नवी दिल्ली : सीबीआयच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती होणार याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीसोबत काल घेण्यात आलेली बैठकही अनिर्णित राहिली. या समितीचे सदस्य असणाऱ्या मल्लिकार्जुन खर्गे यांची हरकत असतानाही आज शनिवारी सीबीआयच्या संचालकांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

संचालकपदाच्या या शर्यतीत वरिष्ठ आयपीएस अधिकारी जावेद अहमद, रजनीकांत मिश्रा, एस.एस. देसवाल आणि शिवानंद झा ही नावे आघाडीवर आहेत.

अतिशय महत्त्वाच्या या घोषणेकडा सर्वांचे लक्ष लागले आहे.

बदलीच्या या निर्णयानंतर वर्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत पुन्हा सीबीआय संचालक पद मिळविले होते. मात्र, त्यांची याच दिवशी मोदी यांनी बदली करत होमगार्डच्या संचालकपदी नियुक्ती केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवड समितीचे अध्यक्ष आहेत. तसंच न्यायमूर्ती सिक्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे हो दोन सदस्य आहेत. वर्मा यांच्या बदलीला सिक्री यांनी मोदींच्या बाजुने मत दिले होते, तर खर्गे यांनी विरोध केला होता. या बैठकीत ऐंशी अधिकाऱ्यांच्या नावांच्या यादीवर चर्चा होणार आहे. यातून नवे संचालक निवडले जाणार आहेत.