प्रतिनिधी | भडगाव –
अंजली आय सी यु मल्टीस्पेशालिटी हेल्थ केअर सेंटर चे भव्य उद्घाटन गुरुवार दि 7 रोजी सकाळी 12 वाजता चाळीसगाव रोड येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.
तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील , चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, माजी आमदार दिलीप वाघ , निर्मल सीड्सच्या संचालिका वैशालीताई सूर्यवंशी , आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
श्रीमती गुंताबाई सूर्यवंशी यांच्या प्रेरणेने अमेरिका व पुणे स्थित व्हेरॉसिटी सॉफ्टवेअर, माऊली फाउंडेशन व अंजली हॉस्पिटलचे संचालक मनोहर सूर्यवंशी , वडजी विविका. सोसायटी चेअरमन, माऊली फाउंडेशनचे उपाध्यक्ष व सूर्यवंशी डेअरीचे संचालक युवराज सूर्यवंशी , सॉफ्टवेअर प्रोफेशनल टेक इन्स्टिट्यूट पुणे चे संचालक भीमराव सूर्यवंशी यांच्या सकल्पनेतून भडगाव सारख्या लहानशा तालुक्यांत सुसज्ज अशा सुविधांसह हॉस्पिटल व्हाव , जणतेला सुविधा मिळावी या उदात्त हेतुन अंजली हॉस्पिटल ची स्थापणा होत असून ग्रामीन भागातील भव्य मल्टीस्पेशालिटी हेल्थ केअर सेंटर ची सुरुवात आज होत आहे. विविध पदाधिकारी व नागरीक या उदघाटण सोहळ्यांस उपस्थित राहणार आहे.
===========
उपलब्ध सेवा =
===========
नागरिकांना वैद्यकीय सेवेसाठी आता पाचोरा, चाळीसगाव ,जळगाव,धुळे आदी ठिकाणी जाण्या येवजी पर्याय उपलब्ध झाला आहे. भडगाव येथे अंजली हॉस्पिटल मध्ये सुसज्ज असे ऑपरेशन थेटर्स सह् भव्य असे हॉस्पिटल थाटण्यात आले आहे.
येथे एम् डि , एम एम, एम बी बी एस अन्य विषेश तज्ञ , स्टाफ नर्स, यांचे 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्घ करण्यात येणार आहे.
======
या हॉस्पिटल मध्ये 24 तास अपघात व आपत्कालीन विभाग , मॉड्युलर ग्लास ऑपरेशन थेटर , इंटेन्सीविस्ट सेवेसह् अत्याधुनिक आयसीयू , आंतर रुग्ण विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत, वैद्यकीय दृष्ट्या सुसज्ज व प्रशस्त रूम जनरल मेडिसिन विभाग यासह वातानुकूलित वार्ड व शेअरिंग रूम बाह्य रुग्ण विभाग, सोनोग्राफी व पूर्णतः डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी, फार्मसी , जनरल ऑर्थो सर्जरी विभाग , न्यूरोसर्जरी विभाग तयार करण्यात आले आहेत . येथे त्वचारोग , न्यूरोसर्जरी , स्पाईन सर्जरी , हृदयरोग , पोटाचे विकार , जनरल सर्जरी , नाक कान घसा, यूरोलॉजी , बाह्य रुग्ण ओपीडी , हाडांचे विकार , अपघात विभाग , सर्पदंश , विषबाधा , पक्षघात आदी आजरा बाबत उपचार करण्यात येणार आहे .
=======