ठाणे : समाजवादी पार्टीचे आमदार अब्बू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद ठाण्यातही उमटले. ठाणे भाजपा युवक मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील माजिवडा येथे अब्बू आझमी आणि वारीस पठाण यांच्या पोस्टरची होळी केली. तसेच त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत घोषणाबाजीही करण्यात आली.