आझमी व वारीस पठाणच्या निषेधार्थ निदर्शने

0

मुक्ताईनगर। देशाचे राष्ट्रीय गान ’वंदे मातरम्’ म्हणण्यास विरोध करुन वेळोवेळी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या आबु आझमी व वारीस पठाण या दोंघांच्या देशद्रोही भुमिकेच्या निषेधार्थ शहरातील 12 कर्तर्व्यदक्ष सामाजिक स्वयंसेवी संघटनातर्फे मंगळवार 1 रोजी सायंकाळी साई चौकात तिव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात यांनी घेतला सहभाग
निदर्शने आंदोलन करतांना शहरातील साईसेवा फाऊंडेशन, वंदे मातरम् गृप, बजरंग दल, जय भवानी युथ फाऊंडेशन, जय भवानी चॅरिटेबल ट्रस्ट, जय भगवान महासंघ, जाणता राजा फ्रेंड्स गृप, समाजसेवा गृप, स्वामी विवेकानंद संस्था, राजे छत्रपती गृप या बारा सामाजिक संस्थाच्या पदाधिकार्‍यांसह सचिन शुरपाटणे, सुभाष सनांसे, धनंजय सापधरे, देवानंद वंजारी, राहुल पाटील, राजेंद्र वंजारी, पवन सोनवणे, राजु कोलते, विजय पोलाखरे, प्रदीप सोनार, पवन खुरपडे, वामन पाटील, विशाल भोजने , अजय कपले, सोनु काचकुटे, किरण निंभोरे, यज्ञेश बोराखेडे, हरीहर पाटील, गणेश तायडे, पल्लव राजपूत आदींसह असंख्य देशभक्त नागरीक उपस्थित होते. तर पोलिस उपनिरिक्षक सचिन इंगळे व पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांचेसह पोलिस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.