नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी समाजवादी पक्षाचे नेते खासदार आझम खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. लोकसभेच्या अध्यक्षस्थानी तालिका अध्यक्षा म्हणून भाजप खासदार रमा देवी बसल्या होत्या, त्यावेळी आझम खान याने ‘ तुम्ही मला इतक्या आवडतात की, तुमच्या डोळ्यात पाहत बसावे असे मला वाटते’ असे विधान केले. या विधानावरून बराच गोंधळ झाला. सत्ताधारी आमदारांनी या विधानाचा निषेध करत आझम खान यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तालिका अध्यक्षा रमा देवी यांनी देखील आझम खान यांनी माफी मागावी असे म्हटले, त्यानंतर आझम खान यांनी तुम्ही माझ्या भगिनी सारख्या असल्याने मी असे बोललो असे म्हटले. त्यानंतर वादावर पडदा पडला.
दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आझम खान यांच्या मनात रमा देवी यांचा अपमान करण्याचा काही उद्देश नव्हता. भाजपच्या खासदारांनी मुद्दामून प्रकरण वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केले आहे.