नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी भारतीय सैन्याच्या जवानांवर आझम खान यांनी अप्रत्यक्षपणे बलात्काराचा आरोप केला असल्याचे दर्शवणारी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यांच्या या विधानावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा एक व्हिडीओसमोर बुधवारी समोर आला आहे. दहशतवाद्यांनी सैन्यातील जवानांचे गुप्तांग कापून नेले. त्यांना जवानांच्या हात, डोके किंवा पायावर आक्षेप नव्हता. त्यांना शरीराच्या ज्या भागावर आक्षेप होता तोच भाग त्यांनी कापून नेला. या घटनेमुळे संपूर्ण देशाची नाचक्की झाली असून आपण जगाला काय तोंड दाखवणार आहोत असा सवाल त्यांनी या व्हिडीओद्वारे केला आहे. देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायमसिंह यादव यांचे निकटवर्तीय आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखल्या जाणार्या आझम खान यांच्या या विधानावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटत असून त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे.
संतप्त प्रतिक्रिया
सध्या देशातील परिस्थिती संवेदनशील असताना आझम खान यांनी हे विधान केले असून या विधानाची आम्ही निंदा करतो असे सपाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. तर आझम खान हे फुटिरतावादी आणि दहशतवाद्यांची भाषा बोलत असून समाजवादी पक्षच त्यांच्या नेत्यांना असे वादग्रस्त विधान करायला लावत असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह यांनी केला आहे.