आझम खान यांनी मला अॅसिड हल्लाची धमकी दिली; जया प्रदा यांचे खळबळजनक आरोप

0

लखनौ-समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या माजी नेत्या जयाप्रदा यांनी केला खळबळजनक आरोप केले आहे. आझम खान यांनी मला तुझ्यावर अॅसिड हल्ला करेन अशा धमक्या दिल्या होत्या, तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली होती असे आरोप केले आहे.

काल जया प्रदा यांनी अमरसिंग यांच्याबाबत मी अमरसिंग यांना राखी बांधली तरीही लोक आम्हाला नावे ठेवतील असे त्या म्हटल्या होत्या. मात्र आता त्यांनी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

मी त्यावेळी आवाज उठवला असता तर माझ्या बाजूने बोलण्यासाठी एकही राजकीय नेता पुढे आला नसता. आजही माझ्या बाजूने बोलण्यास कोणीही पुढे येणार नाही असेही जयाप्रदा यांनी म्हटले आहे. #MeToo या मोहिमेचे जयाप्रदा यांनी कौतुक केले आहे. तसेच या मोहिमेअंतर्गत त्यांनी आता आझम खान यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एक महिला राजकारणात आली आहे हे बहुदा आझम खान यांना बघवले नसावे म्हणून त्यांनी मला अॅसिड हल्ला करण्याची धमकी दिली असेही जयाप्रदा यांनी म्हटले आहे.