धुळे । शहराचा विस्तार वेगाने होत आहे. शिक्षणाच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्यानिमित्ताने धुळे शहरात अनेक लोक वास्तव्यास येतात. परिणामी शहराची लोकसंख्या व क्षेत्रफळ वेगाने वाढत आहे. लोकसंख्ये बरोबरच वाहनांची संख्या वाढली आहे. अर्थात गुन्हेगारी सुद्धा त्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील धुळे असे एकमेव शहर आहे की, ज्या शहरातील पोलिस स्टेशन्सचा स्वत:च्या मालकीच्या स्टेशनला जागा मंजूर! जागा नाहीत. शहरातील शहर पोलिस स्टेशन, मोहाडी पोलिस स्टेशन ही दोन आपल्या स्वत:च्या जागेत आहेत. आझादनगर पोलिस स्टेशन हे अत्यंत संवेदनशील असून सदर पोलिस स्टेशनचा सातत्याने पाठपुरावा करुन आझादनगर पोलिस स्टेशनचे विभाजन करुन चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनची नव्याने निर्मिती करुन दोन भाग केले असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
म्हाडाकडून भूखंड जिल्हा अधिक्षकांकडे हस्तांतरीत
चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनसाठी स्वत:च्या जागेची आवश्यकता होती. यासाठी तीन वर्षे मी सातत्याने प्रयत्नशील होतो. अखेरीस 1982 मध्ये म्हाडाने संपादीत केलेल्या जमिनीपैकी शिल्लक असलेला 946 चौरस मिटर म्हणजेच 10 हजार चौरस फुटाचा भूखंड म्हाडाने रेडी रेकनरच्या दराने उपलब्ध करुन दिला आहे. म्हाडाने तसा ठराव 12 ऑक्टोबर 2017 रोजी केली. सदर भूखंड जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे हस्तांतरीत करण्यासंबधीं म्हणजे अध्यक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी मिलींद म्हैसकर यांनी नाशिक कार्यालयास 2 नोव्हेंबर रोजी सूचित केले आहे.
तत्कालीन आयुक्त डॉ. भोसलेंद्वारा प्रयत्न
आझादनगर पोलिस स्टेशनसाठी मच्छीबाजार चौकात पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्या प्रयत्नाने जागा मिळाली. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन आझादनगर पोलिस स्टेशनसाठी 2 कोटी 40 लाख रुपयांचा निधी प्राप्त करुन घेतला. मच्छीबाजार चौकात आझादनगर पोलिस स्टेशनची तीन मजली इमारत उभारली. ती राज्यातील पोलीस स्टेशनमध्ये प्रथम क्रमांकाची ठरली.
गृहविभागाची तत्वतः मान्यता
अल्पावधीतच देवपूर पूर्व व देवपूर पश्चिम पोलिस स्टेशन व त्या पोलिस स्टेशनच्या कर्मचार्याकरीता 260 सदनिका व सहा पोलिस निरीक्षकांच्या निवासाकरीता 58 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली असल्याचे आ. गोटे यांनी स्पष्ट केले आहे. गृहविभागाने सदर मागणीस तत्वत: मान्यता दिली असून यासंबंधीचा अंतिम निर्णय महिना दोन महिन्यातच घेतला जाईल, असे आ. अनिल गोटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.