आठवडे बाजारातील अतिक्रमण निघणार

0

यावल शहरात भूमी अभिलेख विभागाकडून मोजमापाला सुरूवात

यावल : शहरातील आठवडे बाजारातील अतिक्रमण काढण्याच्या दृष्टीने मंगळवारी भूमी अभिलेख विभागाकडून जागेचे मोजमापचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम हे तीन ते चार दिवसात पूर्ण होईल. मंगळवारी मोजणी स्थळ निश्चित यंत्राच्या साह्याने निश्चित केले जात असून पुढील कार्यवाही 26 डिसेंबर रोजी होणार आहे. शहरातील अंकलेश्वर- बर्‍हाणपूर राज्य मार्गालगत शहरात आठवडे बाजार आहे. सिटी सर्वे नंबर 3851/ 1 आहे. नगरपरीषद संचनालयाने दिलेल्या आदेशानुसार जागा मोजणी करून अतिक्रमण निघणार आहे.

भूमी अभिलेख विभागाला पालिकेकडून फी वर्ग
पालिकेने भूमी अभिलेख विभागाकडे एक लाख 29 हजार रुपये मोजणी फी अदा केली. भूमी अभिलेखकडून मंगळवारी उपअधीक्षक अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोजणी निरीक्षक महेंद्र कोल्हे व आर.टी.कोळी यांचे पथक मोजणीकरीता दाखल झाले तर आधी आठवडे बाजार भागाची त्यांनी पाहणी केली. सोबत मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, कनिष्ठ अभियंता एस.ए.शेखसह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. आधी आठवडे बाजाराचा जागेला लागून असलेल्या जागांची हद्द पाहून नंतर या संपूर्ण सर्वे क्रमांकांचे क्षेत्र यंत्राव्दारे सुनिश्चित केले जाईल अशा स्थळांची चाचपणी करण्यात आली. सायंकाळपर्यंत सभोवतालच्या भागांचे स्थळ निश्चित करण्यात आले तर आता प्रत्यक्षात मूळ आठवडे बाजारक्षेत्राच्या मोजमापाचा पुढील आठवड्यात मंगळवार, 26 डिसेंबर रोजी सुरुवात होईल. त्यानंतर अतिक्रमीत घरे वा व्यवसायीक जागा कळतील.