आठवडे बाजारातील जागेवरुन चिनावलात दंगल

0

रावेर । तालुक्यातील चिनावल येथे मंगळवारच्या आठवडे बाजारात जागेवरुन व्यापार्‍यांमध्ये इतर विक्री करणार्‍यांमध्ये प्रचंड वाद झाला. यात दोन गटात तुफान दगडफेक झाली. दगडफेक व मारहाणीत महिलांसह अनेक जण जखमी झाले. हजारोंचा समुदाय रस्त्यावर उतरला होता. चिनावल गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वत्र पळापळ आणि भितीदायक स्थिती झाली होती. मंगळवार 28 दुपारी दोन-तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. एका समुदायाकडून महिलांना मारहाण झाल्याने संतापाचे वातावरण पसरले आहे.

सावद्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी धावून गेले आहे. अद्याप तणाव गस्त वातावरण आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर घटनास्थळी दाखल झाले आहे. या दंगलीत सुरेश नेमाडे,विलास महाजन,सचिन महाजन रा. चिनावल याच्यासह अनेक जण जखमी झाले आहे. तसेच काही गाड्यांची तोडफोड झाली आहे. महाजन वाडा व बसस्टँण्ड परिसरात दगडफेक करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.

महिलांचा ठिय्या : दरम्यान पोलीस उपअधीक्षक मोक्षदा पाटील, डीवायएसपी अशोक थोरात, सावदाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत सातव आदींनी घटना स्थळी दाखल होऊन परिस्थितिवर नियंत्रण आणले आहे. गावातील संप्तत महिलांनी गावातील ग्राम पंचायतीसमोर ठिय्या आंदोलन करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.