शहादा व ससदे परिसरात बिबट्याने मांडला उछाद

0

शहादा । शेल्टी ता. शहादा व ससदे परिसरात गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने उछाद मांडला आहे. बिबट्याचा वावरण्यामुळे ग्रामस्थासह शेतात काम करणारे शेतकरी व मजुरांचमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसात बिबट्याने तिन शेळ्या फस्त केल्या सदरची घटना शहादा वनविभागाला कळविल्याने अधिकार्यानी दखल घेतली आहे.शेल्टी शिवारात अशोक पाटील ,प्रा ईश्वर पाटील (रा .मोहिदा) यांची शेतजमिन आहे .या शेतात चौपाळा भिल हा रखवालदार म्हणून आहे. तो तेथेच शेतात रहातो. त्यांने 15 ते 20 शेळ्या पाळल्या आहेत. रात्रीतून अचानक बिबट्याने हल्ला करुन तीन शेळ्या फस्त केल्यात शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने चौपाळा भिल याने धाव घेतली असता बिबट्याने पळ काढला. रखवालदाराने सदर घटना गावात सांगितली परिणांमी ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.पुन्हा दोन दिवसांनतर एक वृद्ध महिला शेळ्या चारण्यासाठी गेली असता बिबट्याने पुन्हा शेळ्यावर हल्ला केला.

शेतामध्ये बिबट्याचा संचार
बिबट्याचा संचार शेतामध्ये कायम असल्याने वनविभागाचा अधिकार्‍यांनी शेल्टी व ससदे परिसरात भेट देवुन शेळ्यांचा पंचनामा केला. ग्रामस्थांनी व वनविभागाचा कर्मचार्‍यांनी शेतामध्ये परिसरात मिरची धुव्वा पसरविला. बिबट्या एवढ्यावरच न थांबता गावाजवळील माध्यमिक विद्यालयाच्या शेजारी असलेल्या शिवाजी पाटील यांच्या घराबाहेर बांधलेल्या शेळीवर हल्ला करुन जखमी केले. पांडुरंग मिस्तरी यांचा घराजवळील बांधलेल्या शेळीवर हल्ला केला. आता ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचारी रात्री जंगलात शेतामध्ये पेटत्या मशाली लाठ्या काठ्या हत्यारे घेऊन गस्त घालतात. तर सारंगखेडा पोलीस गस्त करीत असल्याचे सांगण्यात आले. शेल्टी परिसतात वनविभागाने पिंजरे लावलेले आहेत. कर्मचारी गस्त करीत आहेत. आठ कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती शहादा वन क्षेत्रपाल अनिल पवार यांनी दिली.