पिंपरी-चिंचवड : महापालिकेने सुरु केलेल्या ‘सारथी’ हेल्पलाईनला 15 ऑगस्टला चार वर्ष पूर्ण झाली. 15 ऑगस्ट 2013 ते 10 जुलै 2017 या कालावधीत या हेल्पलाईनचा तब्बल 8 लाख 45 हजार 661 नागरिकांनी लाभ घेतला आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी हा लोकप्रिय उपक्रम सुरु केला. पाणी येत नाही, कचरा उचलला जात नाही. विद्युत दिवे बंद आहेत, अशा विविध तक्रारींचा 24 तासांत अगदी चुटकीरसरशी निपटारा होऊ लागला आहे. नागरिकांना नगरसेवकांचे उंबरठे झिजविण्याची गरज राहिली नाही.
प्रभागातील समस्यांसाठी राजकारण्यांकडे जाण्याचा ताण मिटला आहे. शहरातील नागरिकांचा या सारथी हेल्पलाईनला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या परिसरातील तक्रार नागरिक सारथीवर करत आहेत. त्याची लगेच दखल घेऊन समस्याचे निराकण केले जात आहे. सारथी या हेल्पलाईची केंद्र, राज्य सरकारने दखल घेतली. राज्यातील सर्व महापालिकेला या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
परदेशी यांची बदली झाल्यानंतर आलेल्या दोन्ही आयुक्तांकडून दुर्लक्षच झाले होते. मात्र, सध्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विषेश लक्ष दिले आहे. सारथी हेल्पलाईनच्या संकेतस्थळावर 15 ऑगस्ट 2013 ते 10 जुलै 2017 या कालावधीत एक लाख 6 हजार 769 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी एक लाख 6 हजार 509 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर, 260 तक्रारी प्रलंबित आहेत. 98.86 टक्के तक्रारींची पूर्तता करण्यात आली आहे. एसमएसद्वारे 1 हजार 441 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 348 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर, 93 प्रलंबित असून 96.6 तक्रारींची पूर्तता झाली आहे.
पालिका लोकशाही दिन 52 तक्रारी प्राप्त, 87 निकाली, 5 प्रलंबित 98.48 पूर्तता, आयुक्त कार्यालय 1 हजार 415, 1 हजार 163 निकाली, 252 प्रलंबित, 94.36 पूर्तता, सारथी हेल्पलाईन 64 हजार 107 तक्रारी प्राप्त, 63 हजार 294 निकाली, 813 प्रलंबित, 98.73 पूर्तता करण्यात आली आहे. मोबाईल अॅप, असा विविध तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.