आठ वर्षांपासून एकाच व्यक्तिकडे शालेय पोषणचा ठेका

0

जळगाव : जिल्ह्यात शालेय पोषण आहाराच्या मुद्यावरुन नेहमीच वातावरण तापलेले असते. नवीन वर्षातील शालेय पोषण आहार पुरवठादारास शासन आदेश जुगारुन पुरवठ्याचे मुदत देण्यात आले आहे. तसेच पोषण आहार निकृष्ट दर्जाचे असल्याचे तपासणीतुन दिसून आल्याने यात अधिक भर पडली आहे.

जिल्ह्यातील शाळांना शालेय पोषण आहार धान्यादींचा पुरवठा करण्यासाठी देण्यात आलेला मक्ता हा मागील 8 वर्षापासून एकाच ठेकेदाराकडे आहे. 2009 पासून साई मार्केटींग अ‍ॅण्ड ट्रेडींग कंपनीचे सुनिल झवर यांच्याकडे शालेय पोषण आहार पुरवठ्याचा मक्ता आहे. सुरुवातीला कन्झुमर बोर्डाच्या नावाने हा ठेका होता. त्यानंतर सालासर या नावाने होता. नावे जरी वेगळी असली तरी ठेकेदार मात्र एकच असल्याचे शालेय शिक्षण विभागातुन सांगण्यात आले आहे. 2014 मध्ये शालेय पोषण आहारात घोळ झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चौकशी सुरु आहे ही चौकशी अद्यापही सुरुच आहे. कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. एकाच ठेकेदाराकडे वर्षानुवर्षापासून ठेका दिला जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.