आठ वर्षांपासून वॉण्टेड आरोपीच्या बंग्लोरमधून आवळल्या मुसक्या

0

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी

भुसावळ- विनयभंग तसेच शारीरीक व मानसिक छळ प्रकरणात तब्बल आठ वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीच्या बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवार, 12 रोजी बंग्लोरमधून मुसक्या आवळल्या आहेत. सुरेश मदनसिंग चितोडीया (44, रा.बंग्लोर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

वहिनीचा छळ प्रकरणी दाखल होता गुन्हा
भुसावळ शहरातील तक्रारदार असलेली विवाहितेचा पैसे न दिलयाने नात्याने दीर असलेल्या सुरेश मदनसिंग चितोडीया याने छळ करून विनयभंग केल्याने त्याच्याविरुद्ध 30 जून 2011 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. गुन्ह्यानंतर तब्बल आठ वर्षांपासून आरोपीचा शोध सुरू असलातरी तो मिळत नव्हता.

बंग्लोरमधून आवळल्या मुसक्या
संशयीत आरोप बंग्लोरमध्ये असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी बाजारपेठचे उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग, पोलिस कॉन्स्टेबल विकास सातदिवे, समाधान पाटील, ललित बारी यांच्या पथकाला आरोपीस ताब्यात घेण्यासाठी पाठवले. शुक्रवारी पथकाने बंग्लोरमधील जे.सी.नगर येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने स्नोवसिटी परीसरातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या तर बंग्लोर न्यायालयातून ट्रांझीट वॉरंटची परवानगी घेवून भुसावळात आरोपीला आणले जात आहे.