यावल । आडगाव येथील रहिवाशी ज्ञानेश्वर देविदास पाटील (वय 50) हे गेल्या दोन दिवस पासुन काहीतरी चिंतेत दारू पित होते. आज सकाळीही त्यांनी दारू सेवन केली. त्यामुळे त्यांना सकाळी जळगाव जिल्हा रूग्णालयात त्यांचा मुलगा योगेश व दिपक यांनी हलविले. रूग्णालयात उपचारासाठी नेत असतांना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या पश्चात पत्नी दोन अविवाहीत मुले असा छोटासा परीवार आहे.
आडगाव येथे गेल्या अनेक दिवसापासुन दारू विक्री होत असल्याचा आरोप आहे. नुकतेच मनुदेवी मंदिरात नवरात्रोत्सवनिमित्त झालेल्या बैठकीतही पोलीस निरीक्षक परदेशी यांना काही ग्रामस्थ व भाविकांनी आडगावातील दारू बंद करावी याबाबत विनंती केली होती. तरी देखील येथिल दारू बंद न झाल्याने यामुळेच एकाला नाहक आपला जिव गमवावा लागल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.घरातील परीस्थिती गरीबीची असुन त्यांच्या नावावर कर्ज असल्याचे समजते.