शहादा – तालुक्यात आदर्श हायस्कूल आडगाव ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या सुवर्ण जयंतीचे औचित्य साधुन वक्तृत्व स्पर्धा
घेण्यात आली. कार्यक्रमाचा सुरवातीस महात्मा गांधीचा प्रतिमेस पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वृक्षमित्र हैदर नुरानी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी एम.बी.पाटील, राष्ट्र सेवा दल शहादा कार्याध्यक्ष माणक चौधरी, कैलास भावसार ,
मुख्यध्यापक जयराज अहिरे, जायंट्सच्या आशा चौधरी आदी उपस्थित होते. गांधी जयंतीनिमित्त पुर्वसंदेला शाळेत राष्ट्र सेवा दला
तर्फेपाण्याची बचत त्याचे महत्व या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. हैदर नुरानी, एम.बी.पाटील, माणक चौधरी यांनी मनोगत
व्यक्त केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. वक्तृत्व स्पर्धेत 2 गट करण्यात आले होते. त्यात लहान गटात निर्मला रावताळे, राकेश रावताळे,
नंदिनी रावताळे यांनी क्रमांक मिळविला तर मोठया गटात जागृती रावताळे, गायत्री रावताळे, प्रमिला खर्डे यांनी क्रमांक मिळविला.
कार्यक्रमाचा शेवटी पर्यावर्णाचा ऱ्हास करणार नाही अशी पतीज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक कैलास भावसार ,सुत्र संचलन
चतुर्भुज शिंदे तर आभार रवींद्र पाटील यांनी मानले .