धानोरा : येथून जवळ असलेल्या आडगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मंगलाबाई गणेश कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या अडीच महिन्यापासून उपसरपंच अमिना रमजान तडवी यांचेकडे प्रभारी सरपंच पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. अडीच महिन्यापुर्वी आडगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सुनंदाबाई पाटील यांच्यावर अविश्वास दाखल झाल्यानंतर हा कारभार उपसरपंचा अमिना तडवी यांचेकडे होता. त्यानुसार 19 जाने रोजी आडगाव ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी 10 वाजता किनगाव मंडळाधिकारी तुषार घासकडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच निवडी करीता सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सरपंचपदाकरीता शालुबाई पाटील व मंगलाबाई कोळी या दोन्ही महिलांनी आपआपले अर्ज दाखल केले होते. मात्र यात शालुबाई पाटील यांनी माघार घेतल्याने मंगलाबाईकोळी या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यशस्वितेसाठी यांनी केले अभिनंदन
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबा महाहंसजी महाराज, दिलीप शंकरराव पाटील, उपसरपंच अमिना रमजान तडवी, प्रकाश मुलचंद पाटील, हमीदा रमजान तडवी, छब्बीर बाबु तडवी, प्रतिभा रविद्र पाटील, सुनंदा ज्ञानेश्वर पाटील आदि दहा सदस्य उपस्थित होते. यावेळी निवड शांततेत पार पडावी म्हणुन ग्रामसेवक महाजन, तलाठी श्री. तडवी यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे आडगाव ग्रामस्थांसह नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.