पोलादपूर : तालुक्यातील वारकरी संप्रदायाने प्रत्येक गावात देवाचे अथवा संताचे मंदिर अथवा अखंड हरिनाम सप्ताह तसेच विविध सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन करून नित्यसेवा कायम केली असताना हेचि आम्हा करणे काम। बीज वाढवावे नाम। या संतवचनानुसार ह.भ.प. गुरूवर्य रामदादा घाडगे तसेच ह. भ. प. विठोबाआण्णा मालूसरे यांच्याहस्ते आडावळे खडकवाडी या लोकवस्तीमध्ये भगवान श्रीविठ्ठल रखुमाई तसेच संत सेनामहाराज यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
याप्रसंगी पोलादपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील नाभिक समाज तसेच विभागातील भाविकांच्या सहकार्याने संत सेनामहाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करून सकाळी नित्यपूजेनंतर वारकरी भजन आणि महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गायनाचार्य ह.भ.प. निवृत्ती मोरे, नारायण सकपाळ, संतोष कदम, म्रुदूंगाचार्य सूनीलमहाराज मेस्त्री यांनी आपल्या वादनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम यश्स्वी करण्यासाठी खडकवाडी ग्रामस्थ तसेच परिसरातील भाविकांनी मोलाचे सहकार्य केले. मंडळाचे सभासद भार्गव काशितकरशंनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले. दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी गुलालयुक्त पुष्पांची उधळण करून संत सेनामहाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.