आणखी दोन कारचोरांना अटक

0

जळगाव। वाशी येथून भाड्याने आणलेली कार विटनेर गावाजवळून रात्री पळवल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल असून याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. दरम्यान, त्यांना आज शुक्रवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नवी मुंबई परिसरातील वाशी येथून जामनेर येथे लग्नास जात असल्याचे सांगून दोघांनी कार (जीजे 09 बीडी-1817) भाड्याने घेतली होती.

संशयितांची पोलिसाकडून कसून चौकशी
29 डिसेंबर 2016 रोजी कार विटनेर गावाजवळ आल्यानंतर रात्री 12 वाजता चालकाला खाली उतरवून दोघांनी कार औरंगाबादच्या दिशेने पळवून नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी 19 मे रोजी सय्यद शकील सय्यद युसूफ याला अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात सैय्यद इमरान सैय्यद कर्बान (वय-47 रा.लेबर कॉलनी, आनंद कॉम्पलेक्स प्लॅट नं.8, औरंगाबाद) व आबेदखान उर्फ गुड्डू नासिर खान (वय-34 रा.मुर्गीनाला, चुलीपुरा, ए-वन किरणादुकानाजवळ, औरंगाबाद) या दोन संशियितांना शुक्रवारी अटक केली. त्यानंतर त्यानंतर न्यायाधीश एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. कारचोरीप्रकरणी दोन्ही संशयितांना न्या.चौधरी यांनी 30 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.