आणखी पाच वर्ष द्या, जामिनावर असणाऱ्यांना तुरुंगात पाठवेन: मोदी

0

फतेहबाद: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियानातील फतेहबाद येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी कॉंग्रेससह विरोधी पक्षांवर टीका केली. देशाला लुटून खाणारे सर्व नेते आज जामिनावर आहेत. मला आणखी पाच वर्ष द्या, ज्यांनी-ज्यांनी देशाला लुटले आहे त्यांना तुरुंगात पाठविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मोदींनी दिला.

विरोधक देशभरात सरकारविरोधात प्रचार करत आहेत. मात्र संरक्षणाबाबत चकार शब्द विरोधक काढत नाही. हे ‘महामिलावटी’ पक्षाचे नेते संरक्षणाच्या विषयावर का बोलत नाही? संरक्षणाच्या विषयावर बोलायला त्यांच्याकडे काहीही नाही. त्यांच्या सरकारचा इतिहास त्यांना संरक्षणावर बोलू देत नाही अशी टीका मोदींनी केली.