मुंबई-महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या लो डिस्पॅच सेंटरची पाहणी करण्यासाठी तसेच कळवा येथे आढावा बैठकीसाठी जात असतांना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी सीएसएमटीपासून मुलुंडपर्यंत लोकलने प्रवास केला. याबबातची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवरून दिली.
महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या कळवा येथे लो dispatch center ची पाहणी करण्यासाठी आणि आढावा बैठकीच्या निमित्ताने आज सीएसटी ते मुलुंड लोकल प्रवास केला यामुळे वाहतुकीची कोंडी टाळता आली आणि सर्वसामान्य प्रवाश्यांसोबत संवाद साधता आला. pic.twitter.com/C8sOoydTuG
— C Bawankule (@cbawankule) August 30, 2018
सकाळी साडे अकराच्या सुमारास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सीएसटी ते मुलुंड लोकलने प्रवास केला. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांशी संवाद साधला.