प्रेयसीला भेटण्यासाठी निघालेल्या तरुणाच्या कारने अनेकांना उडविले
वाघोली । पुणे-नगर महामार्गावर पुण्यकडे येणार्या सिल्व्हर रंगाच्या एका भरधाव कारने (क्रमांक एम.एच.१२ के.वाय २२९०) अनेक वाहनांना उडविल्याचा अंदाज आहे.
पुणे-नगर रस्त्यावर वाघोलीतील वाघेश्वर चौकापासून सोयरीक मंगल कार्यालयापर्यंत आर्धा किमीच्या अंतरात या कारणे अज्ञात व्यक्तीला जोराची ठोकर देऊन पळून जात असताना त्या कार चालकाचा काही तरूणांने पाठलाग सुरू केल्याने त्या तरूणांची नजर चुकवून तो कार चालक सोयरी मंगलकार्यालया समोरून जुनी भाडाळे वस्ती रत्याने ने आत घुसला व त्या रस्त्यावर जोरात जात असताना एक सायकस्वार व दुचाकी जोराचा धक्का देऊन जोराने पुढे गेला मात्र पुढे रस्ता बंद असल्याने चिखातात रिवर्स घेवून पुन्हा नगररस्तावर वेगाने येऊन खांदवेनगर येथे एका दुचाकी स्वराला जोराची धडक देऊन खराडी चौकातील सिग्नलवर अडकला चौकात अज्ञातांनी गाडी फोडल्याचे चौकातील प्रत्यदर्शींनी सांगितले. मात्र या अपघातात कोणतीही जिवित हानी झाल्याची माहिती मिळू शकली नाही.