मानवी हक्क संरक्षणतर्फे राबविला उपक्रम
भोसरी- वटसावित्री पौर्णिमेला महिलांनी जन्मोजन्मी हाच पती परमेश्वर म्हणून मिळावा म्हणून वटवृक्षाला सातफेर्या मारून सूत बांधून मनोभावे पूजा केली. वटसावित्री पोर्णिमा साजरी केल्यावर वटवृक्षाचे बांधलेले सूत तसेच तेथील आंबे व पूजेचे साहित्य काढले जात नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रोगराई पसरते हे लक्ष्यात आल्यावर आम्ही गेल्या तीन वर्षापासून वटवृक्षाला बांधलेले सूत, प्रसाद एक टेम्पो घेऊन सर्व काढले जाते. त्या झाडाच्या बाजूचा परिसर स्वच्छ केला जातो, असे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले. यासाठी गजानन धारशिवकर यांनी विना मोबदला टेम्पो दिवसभर या सामाजिक कार्यासाठी दिला.
पत्नीसाठी केले व्रत
आपल्या पतीलाही वटवृक्षप्रमाणे दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून पूजा केली. गेल्या तीन वर्षांपासून मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने पुरुष वटवृक्ष पौर्णिमा साजरी करतात. या विकसनशील देशात पती व पत्नी यांना समान हक्क आहेत. आजच्या या युगातील स्त्री चूल आणि मूल न राहता शेतीपासून ते नासापर्यंत सर्वत्र स्त्रिया कार्यरत आहेत. तरी त्या म्हणतात आम्हाला हाच पती मिळावा म्हणून फेर्या मारतात आम्हालाही हीच पत्नी जन्मोजन्मी लाभावी म्हणून आम्ही वटसावित्रीची पौर्णिमा साजरी केली. या उपक्रमामध्ये शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, विकास शहाणे, गजानन धारशिवकर, वसंतराव चकटे, संगीता जोगदंड, आदिती निकम, निलेश हंचाटे, आप्पाजी चव्हाण, हनुमंत पंडित, शिवानंद तालीकोटी, अरविंद मांगले, एस.डी.विभुते, सोमनाथ लखमते, ईश्वर सोनोने, रूपेश जाधव आदींनी सक्रिय सहभाग नोंदविला.