नवी दिल्ली:नवी देशात प्रदूषणाचे गंभीर परिणाम जाणवू लागले आहे. दिल्लीत तर प्रदूषणामुळे नागरिकांना श्वास घेणे अवघड बनले आहे. दरम्यान आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशनला सुरुवात झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पर्यावरण मंत्री प्रकार जावडेकर इलेक्ट्रॉनिक कारने संसद भवनात दाखल झाले. सरकार हळूहळू इलेक्ट्रिक मोटारींकडे वाटचाल करत आहे. प्रदूषणमुक्त देश घडविण्यासाठी याचा हातभार लागणार आहे असे जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
ही इलेक्ट्रॉनिक कारवर सगळ्यांचीच नजर लागली होती. मोटार वाहनामुळे मोठ्या प्रमणात पर्यावरणाची हानी होत आहे. त्यासाठी सरकार नवनवीन उपाययोजना देखील करत आहे.
प्रकाश जावडेकर यांच्याकडे अवजड उद्योग खात्याचे देखील पदभार सोपविण्यात आले आहे. शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रकाश जावडेकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आले आहे.