नवी दिल्ली-आपल्या अनोख्या पद्धतीच्या विरोध प्रदर्शनामुळे प्रसिद्ध असलेले तेलुगू देशम पार्टीचे खासदार एन.शिवप्रसाद यांनी आज अनोख्या पद्धतीने मोदींचा विरोध केला. संसद परिसरात ते रावणाच्या वेषात दिसून आले. रावणाप्रमाणे त्यांनी मोदींचे दहा तोंड लावून निषेध केला. मोदींचे वेगवेगळे चेहरे असणारे मुखवटा त्यांनी लावलेले होते.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन सत्र सुरु होण्यापूर्वी ते संसद परिसरात रावणाच्या वेषात वेशात आले. आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा अशी मागणी होत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली जात आहे.