…आणि हेमा मालिनी मतदारांना म्हणाल्या ‘बसंती की इज्जत का सवाल हैं!

0

भोपाळ-मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधरी पक्ष असल्याने भाजप सत्ता कायम ठेवण्यासाठी विरोधी पक्षावर वरचढ ठरण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. भाजपने स्टार प्रचारक म्हणून खासदार अभिनेत्री हेमा मालिनी यांची निवड केली आहे.

हेमा मालिनी हरदा येथून भाजपच्या तिकिटावर लढत असलेल्या कमल पटेल यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी रॅलीला संबोधित करतांना त्यांनी शोले या चित्रपटातील डायलॉगची आठवण लोकांना करून दिली. ‘बसंती की इज्जत का सवाल हैं!’ असे म्हणत त्यांनी उमेदवाराला विजय करून देण्याचे आवाहन केले.

खासदार हेमा मालिनी यांनी यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारच्या कामगिरीची कौतुकही केले.