रावेत : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 26 जून 1975 साली देशामध्ये आणीबाणी लागू केली होती. आणीबाणी लागू झाल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. आणीबाणीचा निषेध नोंदविण्यासाठी अनेकजण रस्त्यावर उतरले होते. आणीबाणी विरुद्धच्या लढ्यात ज्यांनी सक्रिय सहभाग घेतला; त्या सत्याग्रहींचा यथोचित सन्मान करता यावा, तसेच आताच्या नव्या पिढीला या सत्याग्रहींच्या तोंडून त्यावेळची परिस्थिती आणि रोमांचक लढ्याचे किस्से कळावेत, या उद्देशाने वाल्हेकरवाडीतील शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या वतीने ‘आणीबाणी एक पर्व- सन्मान सोहळा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळातील सत्याग्रहींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जुन्या आठवणींना उजाळा
भारत देशात 26 जून 1975 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणीबाणीचा विरोध केला होता. त्यावेळी अनेकांना अटक झाली होती. अशा कठीण परिस्थितीतही काही जणांनी भूमिगत होऊन आपला लढा सुरूच ठेवला होता. अनेकांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला होता, अशी माहिती देत तत्कालीन सत्याग्रहींनी कार्यक्रमात आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेविका करुणा चिंचवडे, बाळासाहेब ओव्हाळ, आशाराम कसबे, आदेश नवले, हेमंत ननावरे, पाटील बुवा चिंचवडे, सविता पंडित, शंकर पाटील, शशिकांत पाटील, सचिन काळभोर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संयोजन शेखर चिंचवडे, बिभीषण चौधरी, मुकुंद गुरव यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिभीषण चौधरी यांनी केले. तर आभार शेखर चिंचवडे यांनी मानले.
यांचा झाला सन्मान
कार्यक्रमात आणीबाणी संघर्ष समितीचे जनार्दन वाठारकर, प्रदीप काणे, बाबाजी जाधव, निवृत्ती राऊत, बाळासाहेब मोकाशी, कांता जाधव, संभाजी धावडे, दिलीप सुराल, मोहन गुपचूप, बंडू पेठे, महादेव वाठारकर, पांडू भांडेकर, विजय पोरे, राम कुलकर्णी, उदय कवी, सुधीर केसकर, सतीश बोरकर, शिरीष देशपांडे, राणा प्रताप, बापुसाहेब थोरात, अशोक किल्लेदार, तोडकरी, शरद खांबे, प्रकाश डांगे, शरद नाटेकर, धुंडिराज ओक आदींचा सन्मान करण्यात आला.