ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांचे मत
पिंपरी : ‘परमेश्वराने कवींना अक्षरांचा मंत्र बहाल केलेला असतो. एकेक अक्षर एकत्र होऊन तयार होणारे कवींचे शब्द हे रसिकांना कधी हसवतात तर कधी रडवतात. आत÷ड्याला पीळ पडल्यानंतर गझलचा जन्म होतो, असे मत ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांनी नुकतेच निगडीत व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथील जी.एस. कदम सभागृहात निमंत्रितांचे कविसंमेलन झाले. त्या प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात शेख बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (पिंपरी-चिंचवड) शाखाध्यक्ष राजन लाखे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. हेमंत हुईलगोळकर, कवी बी. एस. बनसोडे आदी उपस्थित होते.
विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
डॉ. सांगोलेकर म्हणाले, ‘कविता आणि गझल लेखनासाठी बालसुलभ उत्साहाची आवश्यकता आहे. कवींनी अंत:प्रेरेणे लेख करणे आवश्यक आहे.’ प्रा. पाटील म्हणाले, ‘स्वत: स्थिर पाहून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी जगण्यातला अस्सल अनुभव लागतो. हा अनुभव आपण घ्यायला हवा. ‘डॉ. हेमंत हुईलगोळकर यांनी ज्येष्ठ गझलकर सुरेश भट यांच्या आठवणींना उजाळा दिला. बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करून स्वरचित ‘तणाव’ ही गझल सादर केली. कवी बी. एस. बनसोडे लिखित ‘तुझ्याविना’ या गझलसंग्रहाचे आणि ‘जीवनगाणे’ या काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन झाले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. संजय जगताप यांनी आभार मानले. आशा बनसोडे, सूरज बनसोडे, माधुरी विधाटे, दादा इंचलकर, राजेश जैन यांनी संयोजनासाठी सहकार्य केले.
कविसंमेलनाला मनमोकळी दाद
निमंत्रितांच्या कविसंमनात विविध विषयांना स्पर्श करणार्या कविता सादर झाल्या. त्याला रसिकांकडून मनमोकळी दाद मिळाली. ज्येष्ठ कवी राज अहेरराव अध्यक्षस्थानी होते. त्यात सुमारे 20 कवींनी सहभाग घेतला. रघुनाथ पाटील, दीपेश सुराणा, अशोक कोठारी, डॉ. सुधीर काटे, दीपक अमोलिक, आय. के. शेख, दत्तू ठोकळे, राजेंद्र सोनवणे, महेंद्र गायकवाड यांच्या कविता उल्लेखनीय होत्या. नंदीन सरीन यांनी गझल गायन केले. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले.