पालघर-आम्ही कोणतेही काम केले की काही लोकांकडून विरोध केला जातो. त्यांनी पालघरच्या विकासाबाबत भाष्य केले नाही. ते फक्त प्रत्येक गोष्टीला विरोध करतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेना होती. पण दुर्दैवाने ती आता शिवविरोध सेना झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
वसईतील माणिकपूर येथे शनिवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. यात त्यांनी शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली. पालघरमधील पोटनिवडणुकीत शिवसेनेने पाठित खंजीर खुपसला. वनगा यांच्या मृत्यूचे भांडवल शिवसेना आणि वनगा यांचे चिरंजीव करत आहे. चिंतामण वनगा यांचा आत्मा त्यांना माफ करणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.