आतापर्यंत दहा महिलांनी केला शबरीमाला मंदिरात प्रवेश !

0

थिरूवनंतपुरम- शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून केरळमध्ये तणावाचे वातावरण आहे. १ जानेवारीला काही महिलांनी प्रवेश केला होता. मलेशियन महिलांनी देखील मंदिरात प्रवेश केला. या महिला तमिळ वंशाच्या आहेत. बिंदू आणि कनकदुर्गा यांनी यापूर्वीच भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतले होते. ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. आणखी ४ महिलांनी दर्शन घेतल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. आता दर्शन घेतलेल्या महिलांची संख्या १० इतकी झाली आहे.

पोलिसांनी या सर्व महिलांची माहिती घेतली असून गरज पडल्यास त्यांना न्यायालयात सादर केले जाऊ शकते. ज्या पोलिसांनी मलेशियन महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याची पुष्टी दिली होती. त्यांनी महिलांच्या शबरीमला दर्शनावरून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्यास नकार दिला आहे.

तत्पूर्वी, भाजपाने शनिवारी राज्य सरकार लोकांच्या भावना भडकावत असल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण संवदेनशीलतेने हाताळण्याऐवजी स्थिती आणखी बिघडवली. त्यामुळे अनेक भाविक जखमी तर अनेक जण मृत्यूमुखी पडल्याचे त्यांनी म्हटले आहे.