मुंबई : वाद ग्रस्त शो बिग बॉस १२ वा सीझन अधिक चर्चेत राहिला तो अनुप जलोटा आणि जसलीनच्या रिलेशनशिपमुळे. दोघानाच्या वयात जनरेशन गॅप पाहून हा रेलशन जास्त चर्चेत राहिला. दरम्यान, मराठी बिग बॉसची विजेती मेघा धाडेच्या एन्ट्रीनंतर अनुपजींना बिग बॉसमधून बाहेर जावं लागलं. बाहेर जाताच जलोटांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. आता जलोटांनी आपण जसलीनचं कन्यादान करणार असल्याचं म्हटलं आहे.
एका मुलाखतीदरम्यान ते बोलले, जसलीनसोबतचं रिलेशन हा केवळ बिग बॉसच्या निर्मात्यांचा प्लान असून आता मी जसलीनच्या वडिलांकडे तिचं कन्यादान करण्याची परवानगी मागितली असल्याचे जलोटांनी म्हटलं. इतकंच नव्हे तर जसलीनच्या वडिलांनीदेखील आपल्याला तिचे कन्यादान करण्याची परवानगी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. असे म्हणत जलोटांनी जसलीनसोबतच्या नात्याबद्दलचे अनेक गौप्यस्फोट केले.