आता अॅपवरून ट्रेनमधून नोंदवा एफआयआर

0

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यासाठी प्रवाशाला पुढील स्टेशनची वाट पाहण्याची गरज नाही. ट्रेनमध्ये प्रवाशी मोबाईल अॅपच्या मदतीने एफआयआर दाखल करू शकणार आहेत.

चालत्या ट्रेनमध्ये जर काही गुन्हा घडला तर प्रवाशी TTE ला याची सूचना देतो. नंतर तक्रार दाखल करण्यासाठी टीटीई एक फॉर्म भरायला देतो. हा फॉर्म पुढील स्टेशन आल्यावर RPF-GRP यांना द्यावा लागतो. त्यानंतर तक्रारीचे रुपांतर एफआयआरमध्ये करण्यात येते. मात्र, आता रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी मोबाईल अॅप तयार केला आहे.

सध्या, या अॅपची मध्यप्रदेशात लाईव्ह चाचणी घेण्यात येत आहे. लवकरच ही सुविधा संपूर्ण देशात सुरू करण्यात येणार आहे. मोबाईल अॅपवरुन नोंदवण्यात आलेल्या एफआयआरला ‘झिरो एफआयआर’ , असे संबोधण्यात येणार आहे. झिरो एफआयआर म्हणजे जी कोणत्याही ठिकाणाहून नोंदवण्यात येऊ शकते. नंतर ज्या ठिकाणी घटना घडेल , त्या संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येते. या अॅपवरुन ऑफलाईनरित्याही तक्रार नोंदवण्यात येणार आहे.