आता आला आहे हेलीस्कूप शॉट

0

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉट जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र तुम्ही हेलिस्कूप शॉटचे नाव ऐकलेय का? सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय यात एक क्रिकेटर वेगळाच शॉट खेळताना दिसतोय. ट्विटरवर एका व्यक्तीने हा व्हिडीओ पोस्ट केलाय. 13 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये फलंदाज गदेप्रमाणे बॅट फिरवतो आणि बॉल सीमारेषेपार धाडतो.

दरम्यान, हा सामना कधी आणि कोठे झाला याची सोशल मीडियावर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये. शॉट खेळणार्‍या क्रिकेटरचे नाव ह्युगो हेमंड असून तो इंग्लंडचा क्रिकेटर असल्याचे सांगितले जातेय. सोशल मीडियावर या शॉटला हेलिस्कूप हे नाव देण्यात आलंय.