आता ऑनलाईन सातबारावर तलाठ्यांची डिजीटल सिग्नेचर

0

अलिबाग (सचिन पाटील) : रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधील एक हजार 971 गावा पैकी एक हजार 944 गावांमध्ये ई-चावडी वाचनाचा कार्यक्रम पार पडला आहे. त्याचप्रमाणे 12 तालुक्यांमध्ये आता आॅनलाईन सातबारावर तलाठ्यांची डीजीटल सिग्नेचरही मिळणार अाहे. त्यामुळे आता साताबारावर सही नसणे हि तक्रार निकाली निघाली आहे.

डीजीटल इंडीया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांर्तगत हाती घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील साताबारा हा आन लाईन मिळवा यासाठी सरकारने ही याेजना आखली आहे. त्यामुळे घर बसल्या आपल्याला सातबारा मिळणार आहे.सातबारा आॅन लाईन असल्याने त्यामध्ये काेणतीच खाडाखाेड अथवा बदल करता येणार नसल्याने खाेट्या जमिनींच्या व्यवहारांना चाप लागला आहे. मुळ मालकाच्या संमती शिवाय असे बदल करता येणार नसल्याने बाेगस व्यवहारांचे प्रमाण कमी हाेण्यास मदत मिळणार आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये माेठ्या संख्येने सेझ सारख्या प्रकल्पांचे वारे वाहू लागल्याने माेठ्या संख्येने खाेटे व्यवहार झाले हाेते. या सर्व प्रकारांना राेखण्यासाठी आॅन लाईन सातबारा हा चांगला पर्याय आहे. यासाठीच सरकराने 1 मे2017 पासून जिल्ह्यातील सर्व गावातील जमिनींचे सातबारा आॅन लाईन करण्यावर माेठ्या संख्येने भर देण्यात आला. जिल्ह्यातील 15 तालुक्यातील तब्बल एक हजार 971 गावांपैकी एक हजार 944 गावांमध्ये इ-चावडी वाचनाचा कार्यक्रम पार पडला आहे. 98.63 टक्के काम पूर्ण झाले आहे. चावडी वाचनाच्या वेळी काेणाला काही आक्षेप असती, सातबारामध्ये काही दुरुस्त्या असतील त्या तेथेच करण्यात आल्या. आॅन लाईन सातबाराची प्रिंट प्राप्त झाल्यावर त्यावर लाल शाईने दुरुस्त्या, तर प्रशासनाच्या वतीने तलाठ्याने हिरव्या शाईने त्या दूर करण्याबाबतची प्रक्रीया पार पडली. त्यानंतर परिपूर्ण आॅन लाईन सातबारा आता एका क्लिकवर उपलब्ध हाेत आहेत.

काही महीन्यांपूर्वी आॅन लाईन सातबारा शेतकऱ्यांना मिळत हाेते मात्र त्यावर तलाठ्याची सही घेण्यासाठी पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये जावे लागायचे, तसेच तलाठ्यांची भेट हाेणे हेही कठीण हाेते. यासाठी आता संबंधीत ग्रामपंचायतींच्या तलाठ्यांची डीजीटल सिग्नेचर घेण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तलाठयांच्या डीजीटल सिग्नेचरने सातबारा मिळण्यातील मार्ग माेकळा झाला आहे.

15 तालुक्यांपैकी म्हसळा, श्रीवर्धन आणि माणगाव या तालुक्यांमध्ये डीजीटल सिग्नेचरचे सातबारा उपलब्ध हाेणार नाहीत. येथील काम लवकरच पूर्ण केल्यानंतर तेथेही डीजीटल सिग्नेचरचे सातबारा मिळणार असल्याचे तहसिलदार जयराज देशमुख यांनी सांगितले. मुरुड, पेण, पनवेल, तळा, सुधागड, पाेलादपूर श्रीवर्धन आणि म्हसळा या तालुक्यांमध्ये 100 टक्के इ-चावडी वाचनाचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. अद्यापही अलिबाग-2, उरण-3,कर्जत-8, खालापूर-6, राेहे-2, महाड-3अशा एकूण 27 गावांमध्ये चावडी वाचनाचा कार्यक्रम हाेणे बाकी आहे.

15 तालुक्यातील एक हजार 971 गावातील तब्बल एक लाख 14 हजार 17 सर्व्हेनंबर पैकी एक लाख 11 हजार 9069 सर्व्हेनंबर सातबारावर अंतिम करण्यात आले आहेत. त्याची टक्केवारी 98.16 टक्के आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात व्हीडीआे काॅन्फरन्सद्वारे प्रधान सचिवांनी संवाद साधला.याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित हाेते.