दुबई : कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर आता वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी विराट कोहलीकडे असणार आहे. सध्या या क्रमवारीत द. आफ्रिकेचा ए. बी. डिविलियर्स पेक्षा विराट फक्त 13 गुणांनी पिछाडीवर असून इंग्लंडविरुद्ध 15 जानेवारीपासून प्रारंभ होणार्या मालिकेत धडकेबाज कामगिरी केल्यास वन-डेच्या सिंहासनावर तो विराजमान होईल. सांघिक क्रमवारीतही टीम इंडियाला दुसरे स्थान पटकावण्याची संधी असेल. त्यासाठी इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकवीच लागेल. पण इंग्लंडने मालिका जिंकल्यास टीम इंडिया पाचव्या स्थानावर फेकली जाईल आणि इंग्लंडच्या क्रमवारीत एका स्थानाची सुधारणा होऊन ते चौथ्या स्थानी असतील.
डेव्हिड वॉर्नर आहे शर्यतीत
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी करून आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करण्याची संधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याकडे असणार आहे. पण या अव्वल स्थानासाठी विराटला ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. कारण डेव्हिड वॉर्नर सध्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असून तो विराटशी केवळ दोन गुणांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे विराटला आपले स्थान टीकवण्याचे आव्हान या मालिकेदरम्यान असणार आहे. भारतीय संघाच्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला येत्या १५ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना पुण्यात, तर दुसरा कटक आणि तिसरा कोलकाता येथे होणार आहे.
तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानी
आयसीसीच्या एकदिवसीय संघांच्या क्रमवारीत भारतीय संघ १११ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा संघ १०७ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची मालिका ३-० ने जिंकल्यास भारतीय संघाला ११४ गुणांसह क्रमवारीत दुसरे स्थान गाठता येईल, पण भारताचा पराभव झाल्यास संघाची थेट पाचव्या स्थानावर घसरण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार असून या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज ए.बी.डिव्हिलियर्स फलंदाजांच्या क्रमवारीत सध्या पहिल्या स्थानावर आहे. डिव्हिलियर्सला बाजूला सारून अव्वल स्थानावर कब्जा करण्याची संधी डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहली यांना असणार आहे.
पाकची लागणार कसोटी
पाकिस्तानला 2019 च्या होणार्या वर्ल्डकपसाठी थेट पात्रता मिळवण्याचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारपासून प्रारंभ होत असलेल्या मालिकेत असणार आहे. वन-डे क्रमवारीत पाकचा संघ सध्या आठव्या स्थानावर असून वर्ल्डकपसाठी थेट पात्र ठरायचे असल्यास त्यांना पहिल्या सहा संघात स्थान मिळवावे लागणार आहे. 2019 च्या वर्ल्डकपसाठी 30 सप्टेंबर 2017 पर्यंतची क्रमवारीत ग्राह्य धरली जाईल. शेवटच्या चार स्थानांवर राहणार्या संघांना पुढील वर्षी होणार्या 10 संघाची पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. पाक 89 गुणांसह सध्या आठव्या स्थानावर असून बांगलादेशपेक्षा ते दोन गुणांनी पिछाडीवर आहेत. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच लढतींच्या मालिकेत पाकने दोन लढती जिंकल्यास त्यांचे 91 गुण होतील आणि बांगलादेशशी बरोबरी करतील. ही मालिका जिंकली तर मात्र पाकला थेट पात्र होण्याची संधी आहे.