ओझर । वीज ग्राहकांना सेवा पुरविताना होणारी दमछाक थांबविण्यासाठी महाविरणने आता मोठ्या ग्रामपंचायतींना फे्रंचाईजी द्यायचे ठरविले आहे. यानुसार वीज बिलांचे वाटप, मीटर रीडिंग घेणे आदी कामे या ग्रामपंचायतींना करावी लागणार आहे. यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापक या पदाची भरती केली जाणार आहे. वीजवितरणचे (जुन्नर/आंबेगाव) कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर यांनी ही माहिती दिली. वीजवितरण कंपनीकडे कर्मचार्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांच्या अडचणी सोडविताना महावितरणची दमछाक होते. बर्याचदा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
वीज वितरणच्या कामांची जबाबदारी
नियुक्त केलेल्या ग्राम विद्युत व्यवस्थापकाला गावातील विद्युत ग्राहकांचे मीटर रीडिंग घेणे, वीज देयकांचे वाटप करणे, ब्रेकडाउन अटेंड करुन सप्लाय पूवर्वत करणे, डीओ फ्यूज टाकणे, फ्यूज कॉल तक्रारी घेणे, रस्त्यावरील दिवाबत्ती देखभाल व बंद पडलेले दिवे बदलणे, नवीन वीज जोडणीची कामे करणे, थकबाकदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करणे यासारखी वीज वितरण कंपनीची कामे या ग्रामपंचायतींना सोपवली जाणार आहेत. विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करताना ग्रामपंचायतीने जाहिरात उमेदवाराची नियुक्ती करायची आहे.
व्यवस्थापकाची जबाबदारी ग्रामपंचायतीची
अकरा महिन्यांचा कार्यकाल या कर्मचार्याला देऊन त्याचे काम समाधानपूर्वक असल्यास पुढील लगतच्या प्रत्येक अकरा महिन्यांकरिता कार्य आदेश वाढवून देण्याचा तसेच असमाधानकारक काम असल्यास कार्य आदेश रद्द करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला राहणार आहे. त्याची माहिती महाविरणला द्यायची आहे. कर्मचार्यांवर कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याचे तांत्रिक नियंत्रण व ग्रामपंचायतीचे प्रशासकीय नियंत्रण राहणार आहे.