जळगावः बहूचर्चित घरकुल घोटाळ्यातील आरोपींना धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. सध्या शिक्षा झालेले आरोपी तरुंगात आहेत. त्यापैकी 28 आरोपींनी जामीनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला आहे. आज सोमवारी 16 रोजी या अर्जावर सुनावणी होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली असून आता 18 सप्टेंबर रोजी 28 आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. आज सोमवारी सकाळी 11 वाजता न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे व न्यायमूर्ती के.के.सोनवणे यांच्या खंडपीठासमोर कामकाज झाले. यावेळी सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
घरकुलमधील आरोपींपैकी 18 रोजी सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, चंद्रकांत सोनवणे, भगतराम बालाणी, विजय वाणी, अजय जाधव, चंद्रकांत कापसे, देविदास धांडे, शिवचरण धंडोरे, अरुण शिरसाळे, लता भोईटे, चत्रुभुज सोनवणे, प्रदीप रायसोनी, राजेंद्र मयुर, जगन्नाथ वाणी, अशोक परदेशी, लक्ष्मीकांत चौधरी, सरस्वती कोळी, मीना मंधान, शांताराम सपकाळे, चुडामण पाटील, अशोक सपकाळे आदींच्या अपीलावर न्या. टी.व्ही.नलावडे व न्यायमूर्ती के.के.सोनवणे यांच्या खंडपीठासमोर कामकाज होणार आहे. घरकुल घोटाळ्याचा खटल्यात शिक्षा सुनावण्यापूर्वी हा खंडपीठाचे न्या. टी.व्ही. नलावडे यांच्या खंडपीठासमोर कामकाज झाले आहे. तसेच न्या. नलावडे यांच्याच आदेशाने धुळे येथील विशेष न्यायालयात वर्ग झाला होता.