आता चिनी मांज्यावर बंदी

0

रांची । पर्यावरण, पक्शि आणि नागरिकांना धोकादायक ठरणार्‍या चीनी धागा आणि मांज्यावर बंदी घालणायाचा निर्णय छत्तिसगड सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने पर्यावरण संरक्शण अधिनियम 1986 च्या नियमांचा आधार घेत चीनी धागे, मांज्याचे उत्पादन करणे, साठा करवून ठेवणे तसेच त्याच्या खरेदी आणि विक्री करण्यावर बंदी आणली आहे. या नियमाचे उल्लंघन करणार्‍यास पाच वर्षांची सजा, एक लाख रुपये दंड किंवा या दोन्ही शिक्शा एकत्र भोगाव्या लागणार आहेत. चीनी माज्यांचा वापर पतंग उडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.