आता जगासमोर अर्जुन – मलायका येत आहेत खुलून

0

मुंबई : सध्या चर्चेत असलेली जोडी म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. हे दोघे नेहमी सोबत दिसून येत असतात. एका पार्टीत दोघांची जवळीक कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा पसरली होती. मात्र, अद्यापही दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाहीये. परंतु, यांचे नाते सगळ्यांपासून लपून राहिले नाही.

सोशल मीडियावर दोघांचे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे. पार्टीत सगळ्या मित्रपरिवारात यांच्यातील जवळीक अधिक खुलून दिसत आहे. यामध्ये करिना कपूर, लहान बहिण अमृता अरोरा, सुझैन खान यासोबत आणखी एक खास चेहरा यामध्ये आहे. यामध्ये मलायकाची आधीची जाव म्हणजे सुहेल खानची पत्नी सीमा खान देखील होती.