आता जिओचा 4जी लॅपटॉप

0

मुंबई – एकाहून एक सरस ऑफर आणून धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करणार आहे. जिओ आता स्वस्त लॅपटॉप आणणार असल्याचे वृत्त आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओ लवकरच 4G सिम कार्ड स्लॉट असलेला लॅपटॉप लॉन्च करणार आहे. जिओच्या या लॅपटॉपमध्ये 4ॠ सिम कार्ड स्लॉट असल्याने इंटरनेटचा वापर यावर सहजशक्य होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋेुलेपप कंपनी हे लॅपटॉप बनवणार आहे. 13.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले यामध्ये असणार तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी एचडी कॅमेरा असणार आहे. याशिवाय स्लिम कि-बोर्ड असणार आहे. लॅपटॉपमध्ये इंटेल पेंटियम क्वाड-कोअर प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मेमरी असू शकते. 1.2 किलोग्राम इतकं या लॅपटॉपचं वजन असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीकडून याबबात अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही.