जळगाव – कोरोनाचा जोर ओसरत आहे. आता जिल्ह्यात सहकारी संस्थांसह पुढल्या काळात नगरपरिषदा, जिल्हा परिषदेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. हवा आहे, माणसे आहे पण लोकप्रतिनीधी नाही. आता असे होऊ देऊ नका. प्रत्येक आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात तीन ते चार सदस्य निवडून आणल्यास महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेचा पुढचा अध्यक्ष शिवसेनेचा होईल अशी ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पदाधिकार्यांच्या बैठकीत दिली.