नागपूर । ठाणे आणि डोंबिवलीतील पेट्रोलपंपावर विशिष्ट उपकरणाद्वारे (मायक्रोचिप) पेट्रोलचोरी होत असल्याचा प्रकार उघड जाल्यानमतर पोलिसांनी अन्य ठिकाणीही तपासकार्य सुरु केले व काही पंपांवर असे प्रकार घडत असल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर, तेल कंपन्या आणि पेट्रोलपंपांवरील उपकरणांची निर्मिती करणार्या कंपन्यांसोबत सरकारी अधिकार्यांनी बैठक घेतली. त्यावेळी, पल्सर कार्ड इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सील करणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
गैरप्रकाराला चाप बसणार
पेट्रोलपंप चालक इलेक्ट्रॉनिक चिपद्वारे ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर लूटमारीचा प्रकार रोखण्यासाठी अधिकार्यांनी ठोस उपाय शोधून काढला आहे. ल्सर कार्ड इलेक्ट्रॉनिक पद्धतीनुसार गाड्यांमध्ये इंधन भरण्याचें यंत्र इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सील करून गैरप्रकारा चाप बसवला जाणार आहे.
ठाणे, डोंबिवलीप्रमाणेच राज्यातील जवळपास 90 टक्के पेट्रोलपंपांवर मायक्रोचिप बसवून इंधनचोरी होत असल्याची धक्कादायक माहिती काही उजेडात आली होती. दरम्यानच्या काळात पोलिसांनी धडक कारवाई करीत पेट्रोलपंप चालकांवर कारवाई केली तर अनेक पेट्रोलपंप सील करण्यात आले होते. काही जणांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातील अनेक पेट्रोलपंपांवरही अशी चिप आढळली होती.