आता तालुकानिहाय शिक्षणपरिषदा

0

पुणे । जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या आणि गुणवत्ता चांगल्याप्रकारे वाढली आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेचा लौकीकही आता वाढत आहे. प्राथमिक शाळांची गुणवत्ता, शाळेतील विविध उपक्रम आणि संकल्पानांना वाव देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात तालुकानिहाय शिक्षण परिषदा घेणार असल्याचे जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी शैलजा दराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्ता आणि विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांनी वेगवेगळे प्रयोग शाळेत राबवावेत यासाठी या तालुकानिहाय शिक्षण परिषदा घेण्यात येणार आहेत. भोर तालुक्यात नुकतेच या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी तालुक्यातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

जिल्हाभर राबविणार वैविध्यपुर्ण उपक्रम
शिक्षण परिषदांचे अहवाल जिल्हा परिषदांकडे आल्यानंतर एखाद्या शाळेने अथवा शिक्षकाने शाळांमध्ये राबविलेला एखादा वैविध्यपुर्ण उपक्रम आवडल्यास त्याची संपूर्ण जिल्ह्यातील शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो, असे दराडे यांनी यावेळी माहिती देताना सांगितले.

पुस्तके मिळणार बदलून
बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या पुस्तकातील 16 पाने गाळली होती. तसेच 6 धडे गाळले होते. या चुकांसदर्भात जिल्ह्यातील सर्व शाळांना पत्र पाठवले असून अशी पुस्तके आढळल्यास बालभारतीकडून ती बदलून देण्यात येणार आहेत. पुरंदर तालुक्यात अशी दोन पुस्तके आढळली असून बालभारतीने पुस्तके बदलून दिली आहेत, असे शैलजा दराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.