आता दर बुधवारी कोल्हापूर-शिर्डी रेल्वे

0

कोल्हापूर । कोल्हापूर ते शिर्डी मार्गावर नवी रेल्वेगाडी मंजूर झाली असून, बुधवारी कोल्हापूर रेल्वेस्थानकात या विशेष रेल्वेगाडीला हिरवा कंदील दाखवण्याचा सोहळा होणार आहे. दर बुधवारी सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरुन ही गाडी धावणार आहे. साईनगर येथे गुरूवारी पहाटे 5 वाजून 55 मिनिटांनी गाडी पोहोचेल. शिर्डीतून दर गुरुवारी सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी ती कोल्हापूकडे धावणार आहे. गेली तीन वर्षे ही गाडी सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू होता, ती मागणी पूर्ण झाल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

या गाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून आठवड्याच्या फेर्‍या वाढविण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले, या गाडीला मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर असे प्रमुख थांबे आहेत. या गाडीला 6 जनरल डबे, 7 स्लीपर कोच, वातानूकुलित थ्री टायरचे 2 डबे आणि द्वितीय श्रेणीतील वातानूकुलित एक असे 18 डबे आहेत. जनरलसाठी 170 रुपये तर स्लिपरसाठी 330 रुपये दर आहे. ही गाडी सुरु झाल्याबद्दल साई मंदिरात लाडूवाटपही केले जाणार आहे.’ हवाई नागरी उड्डान मंत्री अशोक गजपती राजू यांनी लोकसभेत कोल्हापूरची विमानसेवा सुरु होण्याचे ठोस आश्वासन दिले होते. 15 ऑक्टोबरपर्यंत विमानसेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. या कालावधीत विमानसेवा सुरु न झाल्यास राजू यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव माडंला जाणार आहे. विमानसेवेबद्दल डेक्कन चार्टर कंपनीसोबत चर्चा पूर्ण झाली आहे.