आता दहाची प्लास्टिकची नोट चलनात येणार

0

नवी दिल्ली: कागदी नोटांचे कमी असलेले आयुष्य पाहता चलनात गोंधळ निर्माण होत आहे. हा गोंधळ थांबविण्यासाठी केंद्र सरकारने इतर देशांच्या धर्तीवर प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. रिर्झव्ह बँकेला केंद्र सरकारकडून सूचना करण्यात आल्या आहेत.

लोकसभेमध्ये यासंदर्भात एका प्रश्‍नाला लेखी उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी याबाबत ही माहिती सादर केली आहे. प्लास्टिक नोटांची चाचणी करण्याबाबत पाच राज्याची निवड करण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास लवकरच चलनातही प्लास्टिकच्या 10 रूपयांच्या नोटा आपणास पहावयास मिळतील.