आता देशात सायकलिंग अजिंक्यपद मालिकेचे आयोजन करणार

0

मुंबई । इंडियन टेरीन फॅशन, माँत्रा आणि चूस माय बायसिकल डॉट कॉम यांनी एकत्रितपणे अखिल भारतीय पातळीवरील चॅम्पियन स्पोर्टीव्ह सिरीज सायकलिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुंबईसह देशातील बंगळुरू, गुरगाव, दिल्ली, हैदराबाद, पुणे, चंदीगड, चेन्नईमध्ये विभागीय पातळीवर आणि दिल्लीत अखिल भारतीय स्तरावरील शर्यत होईल. मुंबईतील स्पर्धा सेव्हन आइसलँड स्पोर्टीव्ह या नावाने ओळखली जाणार असून ही स्पर्धा 17 सप्टेंबर रोजी होईल. या स्पर्धेची स्पर्धा आणि हौशी अशी दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. हौशी गटासाठी 50 किलोमीटर अंतर असेल. स्पर्धागटातील पुरूष आणि महिलांमधील पहिल्या तीन क्रमांकाच्या सायकलपटूंना आठ शहरांमधील विजेत्या सायकलपटूंचा समावेश असलेल्या दिल्लीतील अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.

मुंबईत होणार्‍या शर्यतीत सहभागी होण्यासाठी सायकलपटूंना चुस माय बायसिकल डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. सायकलपटूंना 16 सप्टेंबरपर्यंत नावे नोंदवता येतील. स्पर्धा गटातील सायकलपटूंसाठी 100 किलोमीटरचे अंतर निश्‍चित करण्यात आले आहे.