नवी दिल्ली- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लवकरच १०० रुपयाच्या नवीन नोटा चलनात आणण्याचे जाहीर केले आहे. महात्मा गांधी यांच्या सिरीजमध्ये बनविण्यात येणाऱ्या या नवीन नोटांची डिझाईन वेगळी असणार आहे. या शंभर रुपयाच्या नवीन नोटेत गुजरात राज्यातील ‘रानी की वाव’ बावड़ी(विहीर) दिसणार आहे. नवीन नोटा चलनात आल्यावर जुन्या नोटा देखील चलनातच असणार आहे.
नवीन नोट आकाराने १० रुपयाच्या नोटापेक्षा थोडीशी मोठी असणार आहे.